शिक्षक बॅँक निवडणूक : अंतिम यादी १३ जानेवारीला

By Admin | Updated: December 15, 2015 23:11 IST2015-12-15T22:54:16+5:302015-12-15T23:11:07+5:30

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारुप मतदार यादी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी जाहीर केली आहे.

Teacher Bank Selection: Final list on 13th January | शिक्षक बॅँक निवडणूक : अंतिम यादी १३ जानेवारीला

शिक्षक बॅँक निवडणूक : अंतिम यादी १३ जानेवारीला

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारुप मतदार यादी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी जाहीर केली आहे. या यादीत ९ हजार ८५३ मतदार असून यादीवर येत्या २८ तारखेपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर १३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्षात दहा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
१२ हजार शिक्षक सभासद असणाऱ्या शिक्षक बँकेची निवडणूक रणधुमाळी पेटली आहे. उपनिबंधक यांनी यादी प्रसिद्ध करताच, पहिल्या दिवसापासून उपनिबंधक कार्यालयातील शिक्षक पुढाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. बँकेच्या २१ संचालकांच्या जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. २८ तारखपर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती घेण्यात येणार असून आलेल्या सर्व हकरतींवर ७ तारखेला निकाल देण्यात येणार आहे. त्यानंतर १३ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
प्रारुप यादी प्रसिद्ध होताच शिक्षक संघटनांमधील स्पर्धा चांगलीच वाढली आहे.
कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती राहव्यात, यासाठी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. चार प्रमुख मंडळांसह अन्य लहान मोठ्या संघटना निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असून शिक्षक सभासदांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब होताना दिसत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Teacher Bank Selection: Final list on 13th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.