शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मुंबईतील टाटा कॅन्सरमधील डॉक्टरांच्या लक्झरीचा अपघात; चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:51 IST

मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला.

अहमदनगर : मुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या लक्झरी बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील केडगाव बायपासजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पहाटे चार वाजता केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईवरुन वेरूळकडे निघालेल्या लक्झरी बसमध्ये एकूण ४० डॉक्टर प्रवास करत होते. औरंगाबादमध्ये होणा-या मेडिकल कॉन्फरन्ससाठी हे डॉक्टर निघाले होते. केडगाव बायपासजवळ भरधाव वेगात असणारी लक्झरी बस पाठीमागून कंटेनरला धडकली. या भीषण अपघातामध्ये अर्ध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.

दरवाजाच्या काचा तोडून जखमींना काढले बाहेर समोर जाणाºया कंटनेरला बसची धडक बसल्यानंतर बस कंटनेच्या पाठीमागील बाजूस अडकली़ यावेळी बस ५० फुटापर्यंत कंटनेरने ओढत नेली़ ही बाब कंटनेरचालकांच्या निदर्शनास अल्यानंतर त्याने कंटनेर थांबविले़ यावेळी या अपघातात बसचच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाल्याने चालक टेरिंगच्या मध्ये अडकून मृत्यू झाला होता़ जखमी झालेल्या क्लिनरने इमजर्सी दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले़ 

अपघातील जखमी दिपांजली अडुलर, भाविण विसारिया, आशिष भांगे, स्वाती चुघ, हर्षित, प्रिथी, मनिष मदाने, आस्फिया खान, त्रिरंजन बास, दीपक कुमार, जाहीद मुलानी, सायोग डे,  सचिता पाल, आकांक्षा अनुप, जिन्स मॅथ्यू, निष्ठा सेहरा, प्रशांत नायक, पल्लवी खुरूड, जिमी मंजली, प्राची सावंत, अजय शशीधरन, अनुजकुमार, समर्पिता मोहंती, प्रारब्ध सिंग, अमेरेंद्र कुमार, सुचिता पॉल, वेदांत मूर्ती, सागर गायकवाड, केतकी अडसुळ, उन्मेष मुखर्जी, कस्तुरी वरवा, उपासना सक्सेना, सचिन आनंद, जिफ्मी जोस, निशिता सेहरा, रवी शंकर दास हे किरकोळ जखमी आहेत़ 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMumbaiमुंबई