शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि हो, टप्प्यात आल्यावर राष्ट्रवादीवाले कार्यक्रम करतात; पवार-राणे वादाला नवी 'ऊर्जा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:08 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पवार-राणे ट्विट युद्धात रविवारी (दि़१७) ग्रामीण विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेत निलेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे.

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पवार-राणे ट्विट युद्धात रविवारी (दि़१७) ग्रामीण विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेत निलेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे. ‘पवार घराणे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. आणि हो टप्प्यात आल्यावर राष्ट्रवादीवाले कार्यक्रम करतात,’ असे तनपुरे यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचविण्याची मागणी केली होती. त्यावर शनिवारी भाजप नेते निलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे, याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती. राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले आहे. 

पवार साहेब अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्ट मांडत आहेत. त्यामुळे मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी़’ पवारांच्या या प्रतिक्रियेवर राणे यांनी पुन्हा ट्विट करत म्हटले, ‘मी साखरेवर बोललो. पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नको टाकू. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी.. या ट्विटनंतर मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही पवार- राणे ट्विट युद्धात उडी घेत राणेंना लक्ष्य केले. 

तनपुरे यांनी ट्विट करीत म्हटले की, ‘आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत मांडले. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करतात. आणि हो राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणे विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील हे वाक्  युद्ध आणखी  भडकू शकतं. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेRohit Pawarरोहित पवारNilesh Raneनिलेश राणे NCPराष्ट्रवादी काँग्रेस