नाशिक-पुणे महामार्गावर टॅम्पो उलटला ; दोघे ठार, चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:09 IST2019-05-29T11:43:22+5:302019-05-29T13:09:16+5:30
संगमनेर तालुक्यातील कजुर्ले पठार शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर शासकीय टॅम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर टॅम्पो उलटला ; दोघे ठार, चार जण जखमी
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कजुर्ले पठार शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर शासकीय टॅम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत.
अपघातात मृत्यू झालेले दोघे नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील कर्मचारी होते. महाराष्टÑ शासनाचा टॅम्पो (एम. एच. १५, ए.बी. ५९) घेवून
ते पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी निघाले असता बुधवारी (२९ मे) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला. अनिल सोपान कोळी असे मृत्यू झालेल्या एका कर्मचाºयाचे नाव असून दुसºयाचे नाव समजू शकले नाही. या अपघातात इतर चौघे जणही जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते घटनास्थळी दाखल झाले आहेत.