तळीराम ट्रक चालकाने उडविला नाका, कोपरगावजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 23:03 IST2020-05-25T23:03:44+5:302020-05-25T23:03:48+5:30
कोपरगाव : नाशिक येथून कोपरगावच्या दिशेने येणाºया आॅक्सिजनच्या सिलेंडरने भरलेला आयशर ट्रकवरील मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे नाशिक-नगर हद्दीवरील चेकपोस्ट उडवून तो ट्रक नगरच्या हद्दीत येऊन पलटी झाला. यात नाशिक जिल्ह्याच्या चेकपोस्टवर नियुक्तीस असलेला एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.

तळीराम ट्रक चालकाने उडविला नाका, कोपरगावजवळील घटना
कोपरगाव : नाशिक येथून कोपरगावच्या दिशेने येणाºया आॅक्सिजनच्या सिलेंडरने भरलेला आयशर ट्रकवरील मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे नाशिक-नगर हद्दीवरील चेकपोस्ट उडवून तो ट्रक नगरच्या हद्दीत येऊन पलटी झाला. यात नाशिक जिल्ह्याच्या चेकपोस्टवर नियुक्तीस असलेला एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मद्यधुंद ट्रक चालकास वावी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जखमी शिक्षकास उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. कोपरगाव चेकपोस्टवरील पशुसंवर्धन विभागाच्या वाकळे यांच्या स्कूटीचा चुरा झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पाथरे फाटा येथे नाशिक व नगर पोलिसांचे आपापल्या हद्दीत चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक हद्दीतील वावी पोलीस ठाण्याचे पाथरे फाटा या चेकपोस्टवर चार पोलीस, आरोग्य विभाग, पशुसर्वधन, शिक्षक असे एकूण सात जण कर्तव्यावर होते. तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस नाईक अशोक शिंदे, पिणू ढाकणे, तीन होमगार्ड कर्तव्यावर होते. दरम्यान या घटनेने मात्र पोलीसांची चांगलीच धडकी भरली होती.