विविध मागण्यांसाठी तळेगावकरांकडून पालकमंत्र्याना मागण्यांचे निवेदन
By admin | Updated: May 16, 2017 13:47 IST
पालकमंत्री प्रा.राम शिंदे परिसरात आले असता तळेगाव ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
विविध मागण्यांसाठी तळेगावकरांकडून पालकमंत्र्याना मागण्यांचे निवेदन
तळेगाव दिघे (अहमदनगर) - विविध कामांची पाहणी करणयासाठी पालकमंत्री प्रा.राम शिंदे परिसरात आले असता तळेगाव ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. पालक मंत्र्यांच्या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी परिसरातील अनेक समस्या त्यांच्या समोर मांडल्या. परिसरात लागलेली ५२ पैसे पिकपाहणीची आणेवारी कमी करावी, शेतक-यांची कर्जमुक्ती करावी, तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मरगळ दुर करावी तसेच बंद पडलेला जलशुद्धीकरण प्रकल्प चालु करावा, पाणी योजनेच्या मिटर घोटाळ्याची चौकशी करुन दोंषीवर कारवाई करण्यात यावी, रखडलेल्या रस्त्यांची कामे लवकर व्हावी, निळवंडे धरणाच्या रखडलेल्या चा-यांची कामे लवकरात लवकर सुरु करावी अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पंढरिनाथ इल्हे, फारुकभाई आत्तार, पो.पाटील देविदास कांदळकर, पुंजाभाऊ दिघे, साईनाथ गोडगे, विठ्ठल घोरपडे, राजुभाऊ सोनवणे, राजेश दिघे, दिलीप सोनवणे, डॉ.आभाळे, हरि वाघ व ग्रामस्थ हजर होते.