बंद झालेली तळेगाव योजना पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 18:43 IST2017-04-27T18:43:48+5:302017-04-27T18:43:48+5:30
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व २१ गावांची बंद झालेली प्रादेशिक पाणी योजना बुधवारी पूर्ववत सुरळीत सुरु झाली.

बंद झालेली तळेगाव योजना पुन्हा सुरू
आ नलाईन लोकमततळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व २१ गावांची बंद झालेली प्रादेशिक पाणी योजना बुधवारी पूर्ववत सुरळीत सुरु झाली. आठ दिवसापूर्वी विद्युत रोहित्र जळाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु झाली होती. परंतु पाणी पुरवठा समितीचे सचिव सुरेश मंडलिक, अध्यक्ष प्रभाकर कांदळर, बाबा ओहळ यांच्या प्रयत्नातून अखेर गुरुवारी पाणी योजना सुरळीत सुरू झाली. त्यामुळे आता २१ गावांतील लाभार्थी गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणी पुरवठा लवकर सुरळीत झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत पाणी समितीला धन्यवाद दिले.