तलाठी लाचेच्या जाळ्यात
By Admin | Updated: March 10, 2016 23:14 IST2016-03-10T23:07:03+5:302016-03-10T23:14:05+5:30
श्रीगोंदा : तलाठी अतुल सुपेकर याला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अनुदानाचे पैसे बँकेत वर्ग करण्यासाठी चारशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

तलाठी लाचेच्या जाळ्यात
श्रीगोंदा : तालुक्यातील भानगाव येथील कामगार तलाठी अतुल सुपेकर याला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास अनुदानाचे पैसे बँकेत वर्ग करण्यासाठी चारशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
अतुल सुपेकर या कामगार तलाठ्याची पेडगाव येथून नुकतीच भानगाव येथे बदली झाली होती. भानगाव येथील एक शेतकरी अनुदानाचे पैसे स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग करावे यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत होता. मात्र त्याचे पैसे वर्ग होत नव्हते. पैसे वर्ग करण्यासाठी चारशे रुपयांच्या लाचेची मागणी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास तलाठी सुपेकर याने त्या शेतकऱ्याकडून बँकेत अनुदान जमा करण्यासाठी चारशे रुपयांची रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुपेकर यास रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक विजय मुतर्डक, चंद्रशेखर सावंत, पोलीस कर्मचारी वसंत वाव्हळ, खराडे, गाडे, प्रमोद जरे, नितिन दराडे, एकनाथ आव्हाड, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, शाहाबाज शेख, अंबादास हुलगे आदींनी सहभाग घेतला़