रुग्णवाढीच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:29+5:302021-03-21T04:19:29+5:30
कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रुग्णवाढ नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा. संस्थात्मक विलगीकरण, रुग्णांचे संपर्क शोधून त्यांची कोरोना ...

रुग्णवाढीच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा
कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रुग्णवाढ नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना करा. संस्थात्मक विलगीकरण, रुग्णांचे संपर्क शोधून त्यांची कोरोना चाचणी घेणे, नागरिकांनी मास्क वापरणे संदर्भात पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दंडात्मक कारवाई आणि नागरिकांमध्ये जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी अजित फरगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्या चिकित्सक डॉ. संजीव बेळंबे यांनी कोपरगाव तालुक्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि.१९) विशेष दौरा केला. याप्रसंगी त्यांनी कोपरगाव शहरातील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे भेट दिली. तेथील व्यवस्थापनाचा आढावा घेतला. कोविड संसर्ग नियंत्रण संदर्भात विविध खातेनिहाय सूचना केल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, शहरी आरोग्य केंद्राचे डॉ. गायत्री कांडेकर, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके, स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांचेसह विविध खातेनिहाय अधिकारी, नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.