‘त्या’ माथेफिरूचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST2021-01-08T05:09:16+5:302021-01-08T05:09:16+5:30
पाथर्डी : शहरातील महिलांची छेड काढणाऱ्या माथेफिरूचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन येथील महिलांनी पोलीस निरीक्षकांना मंगळवारी दिले. ...

‘त्या’ माथेफिरूचा बंदोबस्त करा
पाथर्डी : शहरातील महिलांची छेड काढणाऱ्या माथेफिरूचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन येथील महिलांनी पोलीस निरीक्षकांना मंगळवारी दिले.
गेला दीड वर्षांपासून शहरातील विविध भागांमध्ये एक अनोळखी माथेफिरू सातत्याने रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कुठल्याही भागातील घरात कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून किंवा खिडकीतून महिलांची छेड काढत आहे. हा प्रकार सातत्याने चालू आहे. असाच प्रकार मागील पंधरा दिवसांपूर्वी जय भवानी चौक खालचा गणपती या ठिकाणी दोन-तीन कुटुंबाने अनुभवला. असाच प्रकार रविवारच्या पहाटे जुनी पोलीस लाइन रंगार गल्ली येथील एका महिलेच्या बाबतीत घडला. असे प्रकार वारंवार घडूनही त्या माथेफिरूचा बंदोबस्त होत नसल्याने काही महिलांनी नगरसेविका दीपाली बंग यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी तत्काळ सर्व परिसरातील महिलांसमवेत पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन दिले.
यावेळी दीपाली बंग, सुलभा बोरुडे यांनी माथेफिरूचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.
यावेळी सुशीला राठोड, कुसूम देखणे, दुर्गा पैठणकर, पुष्पा देखणे, लीला चिंतामणी, विद्या बरबडे, शारदा येळाई, विजया दारके, सुनीता चोथे, चंदा देखणे, नंदा देखने, सुनीता रोडी, मंगल भागवत, मंगल देखणे, गंगा देखणे, मंगल केदार, सविता क्षीरसागर, मंगल खाटीक, राधा बिडवे, शोभा राऊत आदी उपस्थित होते.
फोटो : ०७ पाथर्डी निवेदन)
पाथर्डी शहरातील महिलांनी येथील माथेफिरूचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले.