तडीपार आरोपीला साथीदारासह पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST2021-05-11T04:20:52+5:302021-05-11T04:20:52+5:30
मात्र, एक आरोपी कारवाईदरम्यान फरार झाला. लॉकडाऊनमध्ये सराईत आरोपी अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ...

तडीपार आरोपीला साथीदारासह पकडले
मात्र, एक आरोपी कारवाईदरम्यान फरार झाला. लॉकडाऊनमध्ये सराईत आरोपी अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तडीपार आनंदा यशवंत काळे (वय ३९), सनी विजय भोसले (वय २३) यांचा समावेश आहे. त्यांचा साथीदार अमित प्रभाकर कुमावत (वय ३०) याने मात्र पोलिसांना चकवा दिला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघा आरोपींना न्यायालयाने १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कर्मचारी सुनील दिघे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---