नागापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; घर, दुकान, मेडिकल फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:08+5:302021-09-02T04:45:08+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोरक्ष दादाराम गारुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी सोमवारी रात्री साडेअकरा ...

नागापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; घर, दुकान, मेडिकल फोडले
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोरक्ष दादाराम गारुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी सोमवारी रात्री साडेअकरा वाजल्यानंतर गारुडकर यांच्या घरातून पैसे, सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर घराजवळच असलेले किराणा दुकान फोडून एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याचवेळी पितळे कॉलनी येथे राहणारे नामदेव शंकर कांडके यांच्या घरातून चोरट्यांनी लॅपटॉप, सोन्याची चेन असा ३५ हजारांचा मुद्देमाल चोरला. त्यानंतर येथील सिनारे हॉस्पिटलमधील मेडिकल फोडून तेथून रोख तीन हजार रुपये चोरून नेले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकिस आली. सोमवारी रात्रभर सर्वत्र पाऊस होता. चोरट्यांनी भरपावसात घरे व दुकाने फोडून चोरी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.