सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST2020-12-16T04:35:50+5:302020-12-16T04:35:50+5:30
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने ...

सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. अर्ज फेटाल्याने कोतकर यांना सीआयडीचे अधिकारी कधीही अटक करू शकतात.
या गुन्ह्यात कोतकर यांना १३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केेला आहे. यावर सीआयडीचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांनी न्यायालयात अर्ज करून हा जामीन रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. केदार केसकर यांनी युक्तिवाद केला. तर कोतकर यांच्यावतीने ॲड. नितीन गवारे यांनी युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजुने युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित शेटे यांनी निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला.
केडगाव येथे ७ एप्रिल २०२१८ राेजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रथम ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सुवर्णा कोतकर यांचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून कोतकर या फरार होत्या. आता त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सीआयडी त्यांना कधीही अटक करू शकते.