पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:07+5:302020-12-27T04:16:07+5:30

आरती सोमनाथ कदम (२८) ही महिला आपल्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहते. २० डिसेंबर रोजी दुपारी एक ...

Suspicion on wife's character, crime on husband | पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीवर गुन्हा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीवर गुन्हा

आरती सोमनाथ कदम (२८) ही महिला आपल्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहते. २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेदरम्यान आरोपी सोमनाथ कदम याने त्याची पत्नी आरती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी नळीने तिच्या डोक्यात, पाठीवर, कंबरेवर, हातापायांवर, तसेच पोटावर मारून जखमी केले. तिला शिवीगाळ करून तुला व मुलांना मारून टाकीन व मी देखील आत्महत्या करील, अशी धमकी दिली. घटनेनंतर आरती कदम या महिलेने राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तिचा पती सोमनाथ दादा कदम याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. आर. चव्हाण करीत आहेत.

Web Title: Suspicion on wife's character, crime on husband