कान्हूर पठार घाटावर दुचाकीस्वाराने वाचविला हरणाच्या पाडसाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 15:13 IST2017-11-24T15:08:57+5:302017-11-24T15:13:15+5:30
टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार घाटावर आपल्या आईपासून दुरावलेल्या हरणाच्या चिमुकल्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीने वासुंदे येथील शिक्षक दत्तात्रय औटी ...

कान्हूर पठार घाटावर दुचाकीस्वाराने वाचविला हरणाच्या पाडसाचा जीव
टाकळी ढोकेश्वर : कान्हूर पठार घाटावर आपल्या आईपासून दुरावलेल्या हरणाच्या चिमुकल्या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीने वासुंदे येथील शिक्षक दत्तात्रय औटी यांनी वाचविले़ ते पारनेरवरुन टाकळी ढोकेश्वरला दुचाकीवरुन येत होते़
औटी यांनी नंतर या पाडसाला चारचाकी गाडीमध्ये टाकून टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाच्या कार्यालयात आणून वन कर्मचाºयांच्या स्वाधीन केले. तोपर्यंत पाडस घाबरलेल्या अवस्थेत होते. थोड्या वेळाने पाणी पाजल्यावर पाडस तरतरले आणि सर्वांचा जीव पाण्यात पडला. भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, निवडुंगेवाडी पठार परिसरात मोठमोठे हरणाचे कळप आहेत. परिसर हिरवळीने नटलेला तसेच मुबलक प्रमाणात पाणी असल्याने हरणांचे कळपाची कळप बागडताना दिसतात. त्यात शेतातून जाताना हे पाडस आपल्या आईपासून दुरावले. त्यानंतर या पाडसाला वडगाव सावताळ येथील वनीकरणात नेवून सोडण्यात आले.