शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हेत दिलीप गांधी पिछाडीवर, म्हणून सुजय यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 08:01 IST

भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

मुंबई : उमेदवारी देत असताना आम्ही लोकांच्या मतांचा विचार करतो. नगरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात विद्यमान खा. दिलीप गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याचे लक्षात आले. तीन सर्वेक्षणांमधून हीच गोष्ट समोर आली. त्यातच सुजय यांना उमेदवारी हवी होती. मात्र तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना तिकीट मिळत नव्हते. त्यामुळेच आम्ही त्यांना उमेदवारी दिली, अशी माहिती भाजपचे संकटमोचक व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लोकमत फेसबूक लाईव्हमध्ये मुलाखत देताना ते बोलत होते.

माझ्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांना मी न्याय देत आहे. माझ्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. त्यात मी आनंदी आहे. मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही आणि तो कधीही मनात आलेला नाही, असं उत्तरही महाजन यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक अशी तुमची ओळख आहे. आपण स्वत: मुख्यमंत्री व्हावे, असा विचार कधी डोक्यात आला का?, असा प्रश्न लोकमत फेसबुक लाईव्हमध्ये एका चाहत्याने विचारला होता, त्यावर महाजन बोलले.

दोन्ही काँग्रेसमधील नेते पक्ष प्रवेश करण्याच्या आधी तुमचीच भेट का घेतात, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी सगळे तुमच्याशी चर्चा का करतात, असे प्रश्नही महाजनांना विचारण्यात आले. त्यावर महाजन यांनी गमतीशीर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना माझा बंगला लागतो. माझा बंगला आधी येत असल्याने ही नेतेमंडळी आधी माझ्याकडे येत असावीत, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.भाजपचे सरकार आल्यानंतर मोर्चे, आंदोलनाचे प्रमाण वाढले. त्याचे कारण विचारल्यावर महाजन म्हणाले, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांना सरकारकडून अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील आहेत. ते प्रश्न समजून घेतात. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, म्हणून लोक मोर्चे घेऊन येतात असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनSujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगर