...अखेर सुरेगावकरांची इच्छा झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:05+5:302021-05-04T04:10:05+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे सोमवारी आरोग्य विभागाने कोरोना लसीकरण मोहीम राबविली आणि अखेर सुरेगावकरांची इच्छा पूर्ण झाली. ...

...अखेर सुरेगावकरांची इच्छा झाली पूर्ण
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे सोमवारी आरोग्य विभागाने कोरोना लसीकरण मोहीम राबविली आणि अखेर सुरेगावकरांची इच्छा पूर्ण झाली.
कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अंतरावर असल्याने ‘इच्छा असतानाही सुरेगावकर लसीकरणापासून वंचित’ या माथळ्याखाली शुक्रवारी (दि.३) ‘लोकमत’ध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी तातडीने दखल घेऊन सुरेगाव येथे लसीकरण मोहीम राबविण्याबाबत कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल अडसरे यांना सूचना केली. त्यामुळे सुरेगाव येथे सोमवारी आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेचा १५४ नागरिकांनी लाभ घेतला.
सोमवारअखेर कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मुंगूसगाव, चिखली, भानगाव, सुरेगाव व कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ५८८ नागरिकांचे लसीकरण याच भागात करण्यात आले असल्याचे डॉ. अमोल अडसरे यांनी सांगितले. यावेळी कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव रोडे, माजी सरपंच सर्जेराव रोडे, डॉ. अनिल मोरे, रामकृष्ण रोडे व कांतीलाल खंडागळे, बाळासाहेब दारकुंडे, ग्रामसेवक सुरेखा कुसाळकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सुरेगाव आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता जगदाळे, आरोग्य सेविका आशा खांदवे, अशोक गडेकर, योगेश सुतार, आशा सेविका सुनीता आडागळे, संध्या रामफळे, अंगणवाडी सेविका निर्मला मोरे व इंदूबाई घायाळ यांनी परिश्रम घेतले.
----
०३ सुरेगाव न्यूज, सुरेगाव लसीकरण