सुरेगाव सोसायटीची दोन गटांत अटीतटीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:25+5:302021-04-02T04:20:25+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची शुक्रवारी (दि.२) निवडणूक होत आहे. सत्ताधारी प. पू. ...

सुरेगाव सोसायटीची दोन गटांत अटीतटीची लढत
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची शुक्रवारी (दि.२) निवडणूक होत आहे. सत्ताधारी प. पू. आनंदाश्रम स्वामी पॅनलच्या विरोधात स्वामीकृपा महाविकास परिवर्तन पॅनलने दंड थोपटले आहे. त्यामुळे दोन गटांतील ही निवडणूक अटीतटीची होत आहे.
या निवडणुकीला नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची झालर आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव रोडे व माजी सरपंच सर्जेराव रोडे यांच्या पॅनलच्या सातपैकी पाच जागा निवडून येऊनही आरक्षणामुळे केवळ दोन सदस्य असलेल्या डॉ. अनिल मोरे व गुलाब रामफळे यांच्या पॅनलच्या मंगल प्रसाद रामफळे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली. सध्या या संस्थेवर रोडे बंधूंची सत्ता आहे. सत्ताधारी गटाकडून संस्थाध्यक्ष राजेंद्र रोडे व संतोष शिंदे हे प्रमुख उमेदवार आहेत. या निवडणुकीत परिवर्तन करायचेच, या इर्षेने ग्रामपंचायतीची निवडणूक स्वत: न लढता पॅनलचे नेतृत्व करणारे डॉ. अनिल मोरे व गुलाब रामफळे हे यावेळी निवडणूक लढवून विरोधी पॅनलचे नेतृत्व करत आहेत. मागील पाच वर्षे दोन्ही पॅनलचे प्रमुख एकत्र कारभार करत होते. मात्र, यावेळी बेबनाव होऊन विरोधात लढत असल्याचे चित्र आहे.