मुख्यमंत्र्यांच्या गड-किल्ले संवर्धन मोहिमेस शिवबा संघटनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:44+5:302021-06-19T04:14:44+5:30

निघोज : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या आवाहनाला ...

Support of Shivba organization for Chief Minister's fort conservation campaign | मुख्यमंत्र्यांच्या गड-किल्ले संवर्धन मोहिमेस शिवबा संघटनेचा पाठिंबा

मुख्यमंत्र्यांच्या गड-किल्ले संवर्धन मोहिमेस शिवबा संघटनेचा पाठिंबा

निघोज : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या आवाहनाला निघोज (ता.पारनेर) येथील शिवबा संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.

शिवबा संघटनेने यापूर्वीच गड-किल्ले संवर्धन मोहीम राबविली आहे. त्याची दखल घेऊन ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ने शिवबा संघटनेचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. शिवबा संघटना ही गड-किल्ले संवर्धन, रक्तदान शिबिरे, शेतकऱ्यांसाठी आंदोलने अशा सामाजिक प्रश्नावर काम करीत आहे. कोरोना काळात शिबिर घेऊन १०० शिवभक्तांनी रक्तदान केले.

यामध्ये शिवबा संघटनेचे संस्थापक अनिल शेटे, निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, शिव व्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, स्वाती नर्हे, स्वप्निल लामखडे, राजू लाळगे, लहू गागरे, एकनाथ शेटे, मच्छिंद्र लाळगे, प्रा. ज्ञानेश्वर कवडे, जालिंदर लंके, रोहिदास लामखडे, विश्वास शेटे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, शंकर गुंड, सतीश साळवे, अंकुश लामखडे, सोमनाथ भाकरे, नागेश नरसाळे, गणेश नरसाळे, भय्या पठाण, प्रीतेश पानमंद, नीलेश दरेकर, गणेश चत्तर, अमोल ठुबे, यशोदीप रहाणे, सुदाम वरखडे, पोपट वरखडे, अक्षय जाधव, अंकुश अडसूळ, यश अडसूळ आदींचा विविध उपक्रमांसाठी पाठिंबा असतो.

Web Title: Support of Shivba organization for Chief Minister's fort conservation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.