नेवाशात शेतकरी आंदोलनास पाठिंबा
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:56+5:302020-12-09T04:16:56+5:30
नेवासा तालुक्यातील अखिल भारतीय किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस अशा विविध राजकीय संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. तालुक्यात काही ...

नेवाशात शेतकरी आंदोलनास पाठिंबा
नेवासा तालुक्यातील अखिल भारतीय किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस अशा विविध राजकीय संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. तालुक्यात काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू होते. नेवासा येथे किसान सभा व काँग्रेसच्या वतीने गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी, काँग्रेस, भारतीय किसान सभा यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार रूपेश सुराणा व प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आ. पांडुरंग अभंग, किसान सभेचे नेते कॉ. बाबा आरगडे, जनार्दन पटारे, अशोक मिसाळ, गणेश गव्हाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, कॉ. बन्सी सातपुते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दादा गंडाळ, शहराध्यक्ष गफूर बागवान, शंकर भारस्कर, दत्तात्रय खाटीक, नामदेव निकम, बाळासाहेब आरगडे, नामदेव शिंदे, नीलेश तनपुरे, सुनील गागरे, बाबासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब सावंत, पोपट जिरे आदी उपस्थित होते.