जिल्हा प्रशासन कोरोना औषधीपुरवठा करण्यात सापत्न वागणूक देत असल्याने प्रशासन अधिकाऱ्यांचा विशेषकरून प्रांताधिकारी व औषध निरीक्षकांचा निषेध नोंदवण्यात आला.
आमदार डाॅ. किरण लहामटे व तहसीलदार मुकेश कांबळे मोर्चास सामोरे गेले. प्रांताधिकाऱ्यांनी संयुक्तिक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तरे दिली, याचा आंदोलकांनी निषेध केला. प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली.
रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा काळाबाजार होतोय. १५ एप्रिलला संगमनेर तालुक्यासाठी ४८२ पैैकी ४७२ अन् अकोलेला केेेवळ १० रेमडेसिविर इंजेक्शन हा दुजाभाव करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करा. २८० रुपयांना मिळणारे ऑक्सिजन सिलिंडर चढ्याभावाने ७०० रुपयांना घ्यावे लागते. ऑक्सिजन गॅस एजन्सी चालवणाऱ्या जाजू यांच्याकडून एजन्सी काढून घ्या. ऑक्सिजनचा काळाबाजार रोखा. कोरोना लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्या. आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचर यांना प्रोत्साहन भत्ता द्या, अशा मागण्या भाषणांमधून पुढे आल्या.
डाॅ. अजित नवले, साथी दशरथ सावंत, विनय सावंत, महेश नवले, डाॅ. अनिल वाघ, डाॅ. संदीप कडलग, डाॅ. विष्णू बुळे, महेश नवले, बी.जे. देशमुख, शंभू नेहे, सचिन शिंदे, डाॅ. सतीश चासकर, सुरेश नवले यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
दादापाटील वाकचौरे, भानुदास तिकांडे, मीनानाथ पांडे, दत्ता नवले, बाळासाहेब भोर, बाळासाहेब वडजे, रवी मालुंजकर, अरुण सावंत, राजेश धुमाळ, रवी कोटकर, बाळासाहेब नाईकवाडी, अरीफ तांबोळी, रमेश आरोटे, निवृत्ती लांडगे, के.बी. हांडे, संतोष नाईकवाडी, राजू नाईकवाडी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंंभिरे, डाॅ. बाळासाहेब मेेेहेत्रे यांच्यासह वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
१७ अकोले