सुपा एमआयडीसीकडून सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST2021-05-31T04:16:34+5:302021-05-31T04:16:34+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखानदार यांच्याकडे रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याबाबत उपविभागीय अधिकारी ...

Supa handed over six oxygen concentrators from MIDC to the Collector | सुपा एमआयडीसीकडून सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

सुपा एमआयडीसीकडून सहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखानदार यांच्याकडे रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याबाबत उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच टप्प्यात जाफा या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योग समूहाने ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सुपा इंडस्ट्रियालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग धूत, जाफाचे प्रतिनिधी नेमिनाथ सुतार, ज्ञानेश देशपांडे, राजेंद्र बांगर, अमोल काळे व सचिन पोटघन उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सुपा एमआयडीसीतील इपिटॉम, गणराज, आम इंडिया, कॅरिअर मायडिया, केएसपीजी, मिंडा, शंकेश्वर आटा मिल या कारखान्यांनी फूड पॅकेट, ऑक्सिमीट, टेम्प्रेचर गण, मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा केला होता.

---

३० सुपा एमआयडीसी

Web Title: Supa handed over six oxygen concentrators from MIDC to the Collector