रविवारी १६६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:51+5:302021-03-01T04:24:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १४८ जणांना बरे ...

रविवारी १६६ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १४८ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. रविवारी बाधितांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनाचे १,१५१ रुग्ण सक्रिय आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ आणि अँटिजेन चाचणीत १४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (४६), जामखेड (१), कर्जत (२), नगर ग्रामीण (८), नेवासा (५), पारनेर (२६), संगमनेर (२७), श्रीगोंदा (६), श्रीरामपूर (१४), कॅन्टोन्मेंट बोर्ड (२), अकोले (४), जामखेड (१), कर्जत (१),कोपरगाव (१), पाथर्डी (४), राहाता (२०), राहुरी (२), इतर जिल्हा येथील (४) रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी नगर शहर (४९), अकोले (३), जामखेड (१), कर्जत (१), कोपरगाव (१४), नगर ग्रामीण (१४), नेवासा (३), पारनेर (३), राहाता (७), राहुरी (२१), संगमनेर (१६), शेवगाव (४), श्रीगोंदा (५), श्रीरामपूर (५) आणि इतर जिल्हा (२) येथील रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
---------
कोरोना स्थिती
बरे झालेले रुग्ण : ७३,५८७
उपचार सुरू असलेले रूग्ण : १,१५१
मृत्यू : १,१४३
एकूण रूग्णसंख्या : ७५,८८१