श्रीगोंदा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:10 IST2018-08-08T15:10:26+5:302018-08-08T15:10:58+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली

श्रीगोंदा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या
आढळगाव :श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ते घरी एकटेच असल्यामुळे सकाळी शेजा-यांनी पाहिल्यानंतर नातेवाईकांना घटना उघडकीस आली. आर्थिक विवंचणेतून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
जंबे आपल्या पत्नी आणि मुलीसह कोकणगाव येथे राहत होते. त्यांचा मुलगा कामानिमित्त त्याच्या कुटूंबासह श्रीगोंदा येथे वास्तव्यास आहे. तर दोन मुलींचा विवाह झालेला आहे. लहान मुलीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे जंबे यांची पत्नी उपचारासाठी मुलीसह बाहेरगावी होत्या. घरी एकटेच असलेल्या जंबे यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेतला असल्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळीच शेजा-यांनी पाहिल्यानंतर प्रकार उघड झाला.