कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:42+5:302021-09-25T04:21:42+5:30
राजू घोरपडे यांनी वैजू बाभूळगाव सेवा सोसायटी, विविध बँका व फायनान्सकडून शेती, तसेच व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतु गेल्या ...

कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
राजू घोरपडे यांनी वैजू बाभूळगाव सेवा सोसायटी, विविध बँका व फायनान्सकडून शेती, तसेच व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत त्यांना मोठे नुकसान झाले. तसेच व्यवसायालाही फटका बसला. दुसरीकडे बँकांकडून कर्जाचा हप्त्यासाठी तगादे सुरूच होते. कर्जबाजीपणास कंटाळून सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घरातील सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर त्यांनी पडवीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
काही वेळातच घरच्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी व शेजाऱ्यांनी घोरपडे यांना तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. वैजू बाभूळगाव येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घोरपडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
-----------
फोटो- २४ राजू घोरपडे