लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:59+5:302021-05-15T04:18:59+5:30
नेवासा शहरातील साईनाथनगर भागात राहणारे बर्डे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. बर्डे हे गरीब ...

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने मजुराची आत्महत्या
नेवासा शहरातील साईनाथनगर भागात राहणारे बर्डे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. बर्डे हे गरीब कुटुंबातील असून, रोजंदारीवर उदरनिर्वाह करीत होते. मात्र, कोरोना संकटात लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. अखेर नैराश्यातून त्यांनी गुरुवारी दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट दिली. यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.
मागील आठवड्यात श्रीरामपूरजवळ गोंधवणी रोड परिसरात बांधकाम मजूर राजेंद्र रावसाहेब शेळके (वय ३९) यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. रोजगार बुडाल्याने शेळके हे आर्थिक विवंचनेत होते.