विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:16+5:302021-06-25T04:16:16+5:30

ज्योती मोहित साळुंके (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. साळुंके हिचे नातेवाईक नानासाहेब अनर्थे (रा. चंद्रपूर, ता. राहता) यांनी ...

Suicide by strangulation of a married woman | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

ज्योती मोहित साळुंके (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. साळुंके हिचे नातेवाईक नानासाहेब अनर्थे (रा. चंद्रपूर, ता. राहता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून आरोपी पती मोहित लक्ष्मण साळुंके, सासरा लक्ष्मण साळुंके व सासू मीना लक्ष्मण साळुंके यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चार वर्षांपूर्वी ज्योती हिचा विवाह मोहित साळुंकेबरोबर झाला होता. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता. काही दिवसांपूर्वी इतर तीन आरोपींनी ज्योती हिला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. माहेरची आर्थिक परिस्थिती पैसे देण्यासारखी नसल्यामुळे तिने पैसे आणले नाहीत. त्यामुळे तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. त्यातून ज्योती हिने जीवन संपविले.

माहेरच्या लोकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. तिचा मृतदेह पाहून घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या प्रकरणी वाद चिघळला. पोलिसांना घटनेची खबर मिळाली. ज्योती हिच्या नातेवाइकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. पोलिसांनी मध्यस्थी करीत आरोपींना तत्काळ अटक केली. शवविच्छेदनानंतर ज्योतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

--------

Web Title: Suicide by strangulation of a married woman