छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:28+5:302021-07-28T04:22:28+5:30
सागर रघुनाथ मोहिते (पती), रघुनाथ नामदेव मोहिते (सासरा), सुवर्णा रघुनाथ मोहिते (सासू), पूजा रघुनाथ माेहिते (नणंद) (सर्व रा. सोनेमळा, ...

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सागर रघुनाथ मोहिते (पती), रघुनाथ नामदेव मोहिते (सासरा), सुवर्णा रघुनाथ मोहिते (सासू), पूजा रघुनाथ माेहिते (नणंद) (सर्व रा. सोनेमळा, जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर), बबन दौलत पवार (मामेसासरा)( रा. शाहूनगर, अकोले), अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मयत पूजा मोहिते यांचे वडील विष्णू नामदेव कर्णिक (कारखाना रस्ता, अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा मोहिते या सासरी नांदत असताना माहेराहून सोने आणि पैसे आणण्यासाठी त्यांचा छळ सुरू होता. शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना उपाशी ठेवले जात होते. सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले, असे फिर्यादीत म्हटले. उपचारार्थ त्यांना सुरुवातीला संगमनेरातील व त्यानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास निधन झाले. अधिक तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.