एकतर्फी प्रेमातून विळद येथे परप्रांतीय इसमाची गोळी झाडून आत्महत्या; महिलेलाही मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:21 IST2017-11-25T13:17:59+5:302017-11-25T13:21:34+5:30
नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे.

एकतर्फी प्रेमातून विळद येथे परप्रांतीय इसमाची गोळी झाडून आत्महत्या; महिलेलाही मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर : नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे.
अमृतलाल दुखीराम पाल (वय ४२, रा़ अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. पाल हा एका महिलेवर गेल्या अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. तो अलाहाबादवरुन या महिलेला भेटण्यासाठी विळद येथे येत होता़ संबंधित महिलाही उत्तरप्रदेशातीलच असून ती तिच्या पतीसोबत विळद येथे राहत होती. तर तिचा पती एमआयडीसीत काम करीत होता. या महिलेवर पाल याचे एकतर्फी प्रेम होते़ शनिवारी (दि़ २५) पाल हा संबंधित महिलेला भेटण्यासाठी आला होता. त्याने संबंधित महिलेला विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले़ तेथे त्या महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे या तरुणाने स्वत:वर गोळी झाडली आणि लगेच दुसरी गोळी त्या महिलेवर झाडली. मात्र, ती गोळी महिलेच्या पायावर लागली. त्यामुळे ती वाचली तर पालने स्वत:वर झाडलेली गोळी त्याच्या छातीत घुसली. त्यामुळे तो काही वेळातच गतप्राण झाला. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या तरुणाकडे पिस्तुल आला कोठून याचा तपास पोलीस करीत आहे. दरम्यान जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.