पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: June 25, 2017 08:10 IST2017-06-25T08:10:56+5:302017-06-25T08:10:56+5:30

इसमाने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून स्वत:ला जखमी करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

Suicide attempt in police station | पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्यात येऊन इसमाने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून स्वत:ला जखमी करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
एएसआय प्रकाश जायभाये यांच्या तक्रारीनुसार, जुने शहरातील भगतवाडी येथे राहणारा हमीद खान रशीद खान (४९) हा शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डाबकी रोड पोलीस ठाण्यात आल्यावर तो कौटुंबिक वादातून शिवीगाळ करू लागला आणि पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने खिशातील धारदार ब्लेड काढून त्याच्या दोन्ही हातांवर सपासप मारून घेतले. यात तो रक्तबंबाळ झाला. पोलिसांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी हमीद खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0९ (आत्महत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला.

Web Title: Suicide attempt in police station