पिण्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

By Admin | Updated: June 7, 2016 23:32 IST2016-06-07T23:23:49+5:302016-06-07T23:32:44+5:30

नेवासा : दुष्काळात पाइपलाइनद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून मंगळवारी (दि.७) तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोखंडे वस्तीवर राहणाऱ्या दोघांनी पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Suicide attempt for drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

पिण्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

नेवासा : दुष्काळात पाइपलाइनद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून मंगळवारी (दि.७) तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोखंडे वस्तीवर राहणाऱ्या दोघांनी पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला. पोलिसांनी अंगावर रॉकेल ओतून घेत असतानाच आत्महत्या करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील लोखंडे वस्ती आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. चिलेखनवाडी येथील मुक्ताई मंदिर ते लोखंडे वस्ती गावातून पाईपलाईनद्वारे पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी नागरिकांची मागणी असतांना राजकीय द्वेषातून नागरिकांचे हाल करण्यात येत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या लोखंडे वस्ती येथील लक्ष्मण लोखंडे आणि गोरक्षनाथ लोखंडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. असे असतांना मंगळवारी दुपारी १ पर्यत ते पंचायत समिती कार्यालयात फिरकलेच नाहीत.
गटविकास अधिकारी आल्यावर दुपारी पंचायत समितीच्या आवारात लोखंडे बंधुंनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस हवालदार पवार आणि साठे यांनी दोघांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(तालुका प्रतिनिधी)
घटना घडल्यानंतर नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दोन दिवसात चिलेखनवाडी येथील लोखंडे वस्ती आणि परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करू, असे आश्वासन दिले. तर गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. यामुळे अखेर आत्मदहनाचा मार्ग अवलंबण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ चमोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Suicide attempt for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.