बोधेगावातील काळा ओढ्यावर उसाची ट्राॅली उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:13+5:302021-02-25T04:25:13+5:30

काळा ओढ्यावरचा पूल मागील चार महिन्यांपासून पूर्णपणे उखडला गेला आहे. पुलावर मोठमोठी भगदाडे पडली आहेत. शेवगाव-गेवराई मार्ग हा अत्यंत ...

A sugarcane trolley overturned on a black stream in Bodhegaon | बोधेगावातील काळा ओढ्यावर उसाची ट्राॅली उलटली

बोधेगावातील काळा ओढ्यावर उसाची ट्राॅली उलटली

काळा ओढ्यावरचा पूल मागील चार महिन्यांपासून पूर्णपणे उखडला गेला आहे. पुलावर मोठमोठी भगदाडे पडली आहेत. शेवगाव-गेवराई मार्ग हा अत्यंत रहदारीचा असल्याने, या ठिकाणी वाहनांची आदळआपट नित्याची बनली आहे. ऊस वाहणाऱ्या टायर बैलगाड्यांसह इतर वाहनांसाठी हा पूल मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी रात्री गंगामाई साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टरची भरलेली मागील एक ट्राॅली पूल चढताना खड्ड्यात आदळून उलटली. सुदैवाने त्यावेळी ट्रॅक्टरला इतर दुचाकी, चारचाकी वाहने तेथून ओव्हरटेक करत नव्हते. अन्यथा त्याखाली सापडून मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्राॅलीतील ऊस रस्त्याच्या कडेला फुपाट्यात पडला. रात्री अंधारामुळे काही काळ येथील वाहतूकही ठप्प झाली होती. येथील पुलावर कायम अपघात होत आहेत, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी ठोस अशी दुरुस्ती होताना दिसत नाही. यामुळे प्रवाशांसह नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: A sugarcane trolley overturned on a black stream in Bodhegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.