शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, रास्ता रोको आंदोलनात पुन्हा घुमला राहुरीकरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:06 IST

‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

राहुरी : ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सतिष पवार, अरुण डौले, भागिरथ पवार, राहूल कर्पे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, आसिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाठ, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कारखान्याकडे जाणाºया उसाच्या गाड्या आंदोलकांनी अडविल्या. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. या मार्गावरुन जाणारी सर्व उसाची वाहने अडविण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्याकडेने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. अद्याप आंदोलनस्थळी प्रशासनाचे कोणीही फिरकले नाही. ३४०० रुपये उसाचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी