साखर कामगार रुग्णालयात परिचारिकांना मिठाई वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:23+5:302021-05-20T04:21:23+5:30

याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष संजय खैरे, सुनील गिरमे, साई मंदिराचे सदस्य दीपक गायकवाड, ...

Sugar workers distribute sweets to hospital nurses | साखर कामगार रुग्णालयात परिचारिकांना मिठाई वाटप

साखर कामगार रुग्णालयात परिचारिकांना मिठाई वाटप

याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष संजय खैरे, सुनील गिरमे, साई मंदिराचे सदस्य दीपक गायकवाड, सचिन हारके, रामेश्वर काळे, नंदू काळे, उद्योजक किशोर निर्मळ, डॉ. रवींद्र जगधने व सर्व परिचारिका उपस्थित होत्या. परिचारिकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा केलेला बहुमान ही कामाचीच पावती आहे, असे डॉ. जगधने यावेळी म्हणाले.

उद्योजक किशोर निर्मळ यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळामध्ये आपला प्रपंच व घरदार सोडून परिचारिका रुग्णसेवा प्रदान करत आहेत, ही खरी ईश्वर सेवा आहे, असे गौरवोद्गार काढले.

मंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी स्वागत करून आभार मानले. याप्रसंगी जावेद शेख, रवि चुग, सिद्धार्थ सोनवणे, कैलास पवार, सचिन काळे, नितीन पाटील, यशवंत खंगार, योगेश कणगरे, राहुल होले आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Sugar workers distribute sweets to hospital nurses