लोढा कुटुंबीयांकडून साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:06+5:302021-01-08T05:04:06+5:30

श्रीरामपूर : जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा परिवाराच्या वतीने येथील कामगार रुग्णालयाला अतिदक्षता विभागातील वैद्यकीय उपकरणांसाठी ८४ हजार ...

Sugar from the Lodha family | लोढा कुटुंबीयांकडून साखर

लोढा कुटुंबीयांकडून साखर

श्रीरामपूर : जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा परिवाराच्या वतीने येथील कामगार रुग्णालयाला अतिदक्षता विभागातील वैद्यकीय उपकरणांसाठी ८४ हजार रुपयांचा धनादेश रुग्णालयाचे विश्वस्त अविनाश आपटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पुष्पलता आदिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने, रमेश लोढा, कांतीलाल लोढा, विमल लोढा, राखी लोढा, रश्मी लोढा आदी उपस्थित होते.

आपटे म्हणाले, लोढा परिवाराचे कामगार रुग्णालयाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यांनी आयसीयूतील वैद्यकीय उपकरणांसाठी दिलेली मदत इतरांना प्रेरणादायी ठरेल.

दिवंगत साधना विलास लोढा यांच्या स्मरणार्थ ही मदत देण्यात येत आहे. कामगार रुग्णालयाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. भविष्यातही या रुग्णालयाला भरीव मदत आमच्या परिवाराच्या वतीने दिली जाईल, असे राखी लोढा यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी जगधने यांनी आभार मानले.

------

फोटो ओळी : ०६जैन संघ

...

ओळी- श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा परिवाराच्या वतीने येथील कामगार रुग्णालयाला आयसीयू विभागातील वैद्यकीय उपकरणांसाठी धनादेश देण्यात आला.

---------

Web Title: Sugar from the Lodha family