घरात घुसून जावयाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:01 IST2019-05-09T11:01:07+5:302019-05-09T11:01:48+5:30

स्वत:च्याच घरात नवऱ्याला मैत्रिणीसोबत पाहून पत्नीसह त्याचे सासू-सासरे चांगलेच संतापले अन् चौघांनी मिळून रंगेल जावयाची यथेच्छ धुलाई केली़

Suffering to enter the house | घरात घुसून जावयाला बेदम मारहाण

घरात घुसून जावयाला बेदम मारहाण

अहमदनगर : स्वत:च्याच घरात नवऱ्याला मैत्रिणीसोबत पाहून पत्नीसह त्याचे सासू-सासरे चांगलेच संतापले अन् चौघांनी मिळून रंगेल जावयाची यथेच्छ धुलाई केली़
भिंगारमध्ये ४ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली़ याप्रकरणी मार खालेल्या पतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी त्या तरुणाची पत्नी, सासू, सासरा व चुलत सासºयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ भिंगार येथील विवाहित तरुणाचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते़ त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती़ ४ मे रोजी पत्नीने तिचे आई-वडील व चुलत्यांसह भिंगार गाठले़ घरी येऊन पाहिले तर तिचा नवºयासोबत त्याची मैत्रीण दिसली़ हे दृश्य पाहून त्याच्या पत्नीसह सर्वच संतापले आणि त्यांनी थेट तरुणावर हल्ला करून करून त्याला लाथाबुक्यांनी चांगलेच तुडविले़
या घटनेत चाकूनेही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बेंडकोळी हे पुढील तपास करत आहेत़ या घटनेची भिंगार परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती़

Web Title: Suffering to enter the house