डोंगरगण प्राथमिक शाळेत प्रताप शेळके यांची अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:53+5:302021-01-23T04:21:53+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील डोंगरगण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. येथे जिल्हा परिषद ...

डोंगरगण प्राथमिक शाळेत प्रताप शेळके यांची अचानक भेट
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील डोंगरगण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. शाळेतील मुख्याध्यापक व पालकांना विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जनजागृती करण्यासह शाळेची पटसंख्या कशी वाढेल, यावर भर देण्यास सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे भोसले रावसाहेब, मुख्याध्यापक गिरीजा देशमुख, आरोग्य उपकेंद्रचे पतंगे भाऊसाहेब, ग्रामसेवक सौदागर भाऊसाहेब, ग्रामस्थ बबन अण्णा पटारे, राजू मते , गमाजी मते, सर्जेराव मते, संतोष पटारे, जालिंदर आढाव, आदिनाथ काळे, दत्तू काळे ,बाबा काळे, अशोक चांदणे, राजू चांदणे, संजय पटारे, किशोर काळे, अक्षय शिरसाठ, भाऊसाहेब कदम, सचिन कदम, कुंडलिक भूतकर आदी उपस्थित होते.