तीन प्राध्यापकांचे सेट परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:56+5:302021-04-09T04:20:56+5:30
प्रा. नयना पंजे या यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयात नेट असून आता त्या भूगोल विषयात सेट पात्र झाल्या आहेत. प्रा. संजय ...

तीन प्राध्यापकांचे सेट परीक्षेत यश
प्रा. नयना पंजे या यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयात नेट असून आता त्या भूगोल विषयात सेट पात्र झाल्या आहेत. प्रा. संजय खेमनर दोन वेळेस हिंदी व शिक्षणशास्त्र विषयात नेट व दोन वेळेस सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. यावेळेस ते हिंदी विषयातून सेट परीक्षा पात्र झाले आहे. तर प्रा. विलास पांढरे हे यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयात पात्र असून आता त्यांनी संस्कृत विषयात यश संपादन केले आहे. अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डाॅ. संजय मालपाणी, सचिव डाॅ. अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, मुख्य सचिव नारायण कलंत्री, प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, प्रा. मंगल आरोटे, प्रा. राजू शेख, प्रा. काटे कविता, प्रा. ज्योती मेस्त्री, प्रा. योगिता वाकचौरे, प्रा. जगन गवांदे यांनी त्यांचे कौतुक केले.