वाळकी गटात विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:47+5:302021-09-13T04:20:47+5:30

केडगाव : वाळकी गटात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावण्यात यश आलेले असून निधीची कमतरता भासू दिलेली नाही. जलयुक्त शिवारसह सामाजिक ...

Succeeded in arranging development works in Valaki group | वाळकी गटात विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी

वाळकी गटात विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी

केडगाव : वाळकी गटात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावण्यात यश आलेले असून निधीची कमतरता भासू दिलेली नाही. जलयुक्त शिवारसह सामाजिक वनीकरण, नदी खोलीकरण, बंधारे दुरुस्ती अशा कामांमुळे गावे तालुक्यात आदर्श गाव योजनेच्या नकाशावर आली आहे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी दिली.

नगर तालुक्यातील हिवरेझरे येथील नूतन ग्रामसचिवालयाचे उद्घाटन नुकतेच जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळासाहेब हराळ, पं. स. सभापती सुरेखा गुंड, जि. प. सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, आबासाहेब सोनवणे, डॉ. दिलीप पवार, संतोष लगड, नगरसेवक योगीराज गाडे, झेंडे महाराज, रघुनाथ झिने, सरपंच अनुजा काटे, सुरेश काटे, नारायण रोडे, रोहिदास उदमले, दत्ता काळे, चांद शेख आदी उपस्थित होते.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या निधीतून १५ लाख रुपये ग्राम सचिवालयासाठी उपलब्ध झाले. याशिवाय जिल्हा परिषद निधीतून १० लाख, शाळा खोल्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये, काळेवाडी रस्त्यासाठी २० लाख रुपये, दलित वस्ती सुधार निधीतून ७ लाखांचे रस्ता काँक्रिटीकरण अशा कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

----

१२ हिवरे झरे

हिवरेझरे येथे नवीन ग्रामसचिवालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.

Web Title: Succeeded in arranging development works in Valaki group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.