सुबोध जोशी यांना जीवन गौरव प्रदान

By Admin | Updated: September 10, 2014 23:40 IST2014-09-10T23:27:38+5:302014-09-10T23:40:08+5:30

अहमदनगर: सुविरॉन इक्किमेंट कंपनीचे संचालक सुबोध जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला़

Subodh Joshi is honored with life | सुबोध जोशी यांना जीवन गौरव प्रदान

सुबोध जोशी यांना जीवन गौरव प्रदान

अहमदनगर: सुविरॉन इक्किमेंट कंपनीचे संचालक सुबोध जोशी यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला़ साखर उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे़
नवी दिल्ली येथील शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दरवर्षी उद्योजकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते़ यंदाचा हा पुरस्कार येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक सुबोध जोशी यांना मंगळवारी बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे़ इसजेक हेवी इंजिनिअरिंग कंपनी लि़ व असोसिएशनचे अध्यक्ष जी़एस़ राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला़ साखर उद्योगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आहे़ साखर उद्योगातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे़ जोशी यांनी कानपूर येथे साखर तंत्रज्ञ पदवी संपादन केली आहे़ ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे़ सात वर्षे जोशी यांनी समिरवाडी येथील कंपनीत साखर तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले़ या काळात त्यांनी साखर प्रक्रियेच्या नवनवीन यंत्र सामग्रीचे प्रयोग केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Subodh Joshi is honored with life