उपसरपंचाची तलाठी महिलेला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:42+5:302021-07-28T04:21:42+5:30
गणेश साहेबराव शिंदे (रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाचे नाव आहे. सोमवारी (दि. २७) ...

उपसरपंचाची तलाठी महिलेला शिवीगाळ
गणेश साहेबराव शिंदे (रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाचे नाव आहे. सोमवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास संगमनेर खुर्द गावातील मारुती मंदिरासमोर हा प्रकार घडला.
संबंधित तलाठी महिलेने कार्यालयात काम केल्यानंतर दुचाकीहून त्या दुपारी तीनच्या सुमारास संगमनेर तहसील कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी गावातील मारुती मंदिरासमोर शिंदे यांनी त्यांना आवाज देऊन थांबविले. शिंदे तेथे आले असता त्या गाडीवर बसून होत्या. वारस नोंदीच्या प्रलंबित कामावरून शिंदे यांनी त्यांना विचारले असता ‘तुमचे वारस नोंदीचे काम माझ्या पातळीवर पूर्ण झालेले आहे व त्या कामाचा मी सर्कल ऑफिसर यांना ठराव पाठविला आहे. तो मंजूर होताच मी लगेच फेरफार देते’ असे त्या शिंदे यांना म्हणाल्या. त्यावेळी शिंदे यांनी तलाठी महिलेच्या गाडीची चावी काढत त्यांच्या पिशवीतील कागदपत्रे हिसकावून घेत फेकून दिले. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहेत.