उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची साक्ष

By Admin | Updated: January 12, 2017 04:04 IST2017-01-12T04:04:27+5:302017-01-12T04:04:27+5:30

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी घटनास्थळी प्रथमच पंचनाम करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे

Sub-inspector, witness of assistant inspector | उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची साक्ष

उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची साक्ष

अहमदनगर : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी घटनास्थळी प्रथमच पंचनाम करणारे पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक के.बी़ जोपळे यांची उलटतपासणी, तर सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांची सरतपासणी व उलटतपासणी घेण्यात आली़
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्याची प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे़  खटल्याची बुधवारी सकाळी सुनावणी सुरू झाली, तेव्हा या खटल्यात साक्षीदारांच्या यादीत ज्यांचे नाव आहे, ते मोहन गायकवाड हे न्यायालयात उपस्थित असल्याचे आरोपी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ सुनील मगरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत साक्षीदाराला उपस्थित राहाता येत नाही, असे  सांगितले़ (प्रतिनिधी)

घटनास्थळीच तक्रार

जवखेडे खालसा येथे तिहरे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर फिर्यादी व नंतर आरोपी म्हणून समोर आलेल्या प्रशांत जाधव याने घटनास्थळीच तक्रार दिली. ही तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात पाठविली, त्यानंतर ही फिर्याद दाखल केली होती.

Web Title: Sub-inspector, witness of assistant inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.