उपविभागीय दक्षता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:04+5:302021-06-22T04:15:04+5:30
बैठकीला समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे ...

उपविभागीय दक्षता समितीची बैठक
बैठकीला समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे उपस्थित होते.
बैठकीमध्ये पोलीस स्टेशन स्तरावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद घेणे, नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा व त्यासंदर्भातील केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपाययोजना करणे, समितीच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला सादर करणे, अत्याचारग्रस्त व्यक्ती व कुटुंबाचे पुनर्वसन करणे इत्यादी प्रकरणांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी अत्याचारग्रस्तांना शासकीय मदत मिळावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी तसेच नागरिकांवर अत्याचार होऊ नये यासाठी सर्वसंबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे, असे निर्देश दिले.