उपजिल्हा रुग्णालयात होणार अद्ययावत ऑपरेशन थिएटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:38+5:302021-06-29T04:15:38+5:30
कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयात आता अद्ययावत ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले ...

उपजिल्हा रुग्णालयात होणार अद्ययावत ऑपरेशन थिएटर
कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयात आता अद्ययावत ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही आरोग्यदायी पर्वणीच आहे. सद्य:स्थितीला नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खासगी रुग्णालयांत जाण्याची नामुष्की येत होती. असे असले तरी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या नागरिकांना त्यासाठी लागणारा वेळ, यात होणारा खर्च पेलवणारा नसतो. प्रसंगी अनेकांना जिवालाही मुकावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन रोहित पवार यांनी ऑपरेशन थिएटरसाठी निधी मंजूर केला आहे.