उद्योग व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी पुण्यातील विद्यार्थी नगरमध्ये
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:15:48+5:302014-09-28T23:27:16+5:30
अहमदनगर : पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीेने पुण्यातील विद्यार्थ्यांना नगरमध्यील औद्योगिक व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहे़

उद्योग व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी पुण्यातील विद्यार्थी नगरमध्ये
अहमदनगर : पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीेने पुण्यातील विद्यार्थ्यांना नगरमध्यील औद्योगिक व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहे़ या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यात हे विद्यार्थी विविध उद्योग समूहांना भेटी देऊन कार्यप्रणाली समजून घेणार आहेत़ तसेच गांधी जयंतीनिमित्त नगर शहरातून रॅली काढण्यात येणार आहे़
सूर्यदत्ता संस्थेच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत़ गेल्या दोन वर्षात २ उपक्रमांची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी संस्थेच्या वतीने औद्योगिक संकुलाच्या भेटीचे आयोजन केले जाते़ दरवर्षी सूर्यदत्ता संस्था निवडक ३०० विद्यार्थ्यांना पुण्याबाहेरील, औद्योगिक दृष्ट्या प्रगत शहरांमधील उद्योगांच्या भेटी घडवून आणते़ यंदा अहमदनगर येथे ३० सप्टेंबर, १ व २ आक्टोबर अशा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे़ पहिल्या दिवशी नगर येथील सकाळी आर्मीच्या प्रसिद्ध कॅन्टीनला भेट देऊन विद्यार्थी तेथील ट्रेनिंग सुविधांचे, रणगाडा संग्रहालयाचे निरिक्षण करतील़ कर्नल मनिष राव हे विद्यार्थ्यांना भारतीय आर्मीमध्ये व्यवस्थापनाच्या करियरविषयक मार्गदर्शन करतील़ त्यानंतर सायंकाळी ६ पर्यंत विद्यार्थी वेगवेगळ्या उद्योगसमूहांना भेटी देतील़ त्यानंतर रात्री ८ वाजता नगरमधील विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्यांना ‘सुर्यदत्त’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुंबइतील कलाकार प्रियांका बर्वे, विश्वजीत बोरवणकर, त्यागराज खाडीलकर असे कलाकार गीत गायन व नृत्य सादर करतील़
१ आॅक्टोबरला विद्यार्थी पुन्हा उद्योगांना भेटी देऊन तेथील व्यवस्थापनाचा अभ्यास करतील़ या दोन दिवसात किमान ८ उद्योगांना विद्यार्थी भेट देतील़ यावेळी अरविंद पारगावकर (एल अॅण्ड टी), विजय लेले (सी अॅण्ड जी) बी़ एफ़ शिरूडे (सन फार्मा), सुनित कानवडे (सिध्दी स्टॅम्प), योगेश देव (इटॉन), संतोष बोथरा, अशोक सोनवणे (टेक्नो ट्रॅक,) अजित घैसास (अनिप्रा केम), सुनिल मुनोत (क्लासिक व्हीलस्), बी. बी. चांडक (लोकमत समूह) आदी ‘देशाची सद्य आर्थिक परिस्थिती, उद्योगांसमोरील आव्हाने आणि ती आव्हाने पेलण्यासाठीची तयारी’ या विषयावरील चर्चेत भाग घेतील.
२ आॅक्टोबरला गांधी जयंतीदिनी शहरातून ‘स्वच्छ भारत.... आरोग्यपूर्ण भारत’ या संकल्पनेवर रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली दरम्यान विद्यार्थी पथनाट्य सादर करतील़ या रॅलीनंतर विद्यार्थी ‘स्रेहालय’ या संस्थेला भेट देतील़ नंतर शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या कलाश्री स्टुडिओला विद्यार्थी भेट देऊन ‘शिल्पकला : एक जगण्याची कला’’ या विषयावर तेथे कार्यशाळा होणार आहे़ या उपक्रमात लोकमत समूह सहभागी असून उपक्रमाचे व्यवस्थापन लोकमत बघत आहे. (प्रतिनिधी)