विद्यार्थ्यांनी घेतली नवनागापूर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:27 IST2021-02-27T04:27:55+5:302021-02-27T04:27:55+5:30

नवनागापूर : चेतना कॉलनी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात माझी वसुंधरा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांनी नवनागापूर, घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा ...

The students took a pledge to keep Navnagapur clean | विद्यार्थ्यांनी घेतली नवनागापूर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा

विद्यार्थ्यांनी घेतली नवनागापूर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा

नवनागापूर : चेतना कॉलनी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात माझी वसुंधरा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांनी नवनागापूर, घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.

मुख्याध्यापिका शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा दिली. मी प्रतिज्ञा करतो की, असे म्हणत माझे नवनागापूर गाव, घर व परिसर स्वच्छ ठेवीन, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू, अग्री व आकाश या पंचतत्त्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करील. प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक चमचा, प्लास्टिक स्ट्रॉ, प्लास्टिक कप आदी वापरणार नाही, अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी शाळेतील शिक्षक गोरक्षनाथ गव्हाणे, नगर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जयराम ठुबे, नवनागापूरचे सदस्य सागर सप्रे, दत्ता पाटील सप्रे, संजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मिसाळ आदी उपस्थित होते.

२६ नवनागापूर स्कूल

Web Title: The students took a pledge to keep Navnagapur clean