विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 14, 2016 23:20 IST2016-06-14T23:14:25+5:302016-06-14T23:20:30+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रूक्रजवळील चुडामल वस्ती येथील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने चिंचेच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विद्यार्थ्याची आत्महत्या
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रूक्रजवळील चुडामल वस्ती येथील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने चिंचेच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. प्रवीण भास्कर भांड (वय १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
धोत्रे बुद्रूक येथील प्रवीण भांड हा विहिरीवर पाणी आणण्यासाठी हंडा व बादली घेऊन गेला होता. ओढ्यालगतच्या चिंचेच्या झाडाला बादलीच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला दहावीत ४५ टक्के गुण मिळाले होते. प्रवीण आई- वडिलांना एकुलता एक होता. सकाळी वस्तीवरील काही महिला ओढ्यालगतच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबतची फिर्याद जालिंदर पांडुरंग भांड यांनी टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्रावर दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.