विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:42+5:302021-06-29T04:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील शालेय विद्यार्थ्यानी स्वच्छता क्रांतीचे दूत होऊन शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन ...

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृती करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील शालेय विद्यार्थ्यानी स्वच्छता क्रांतीचे दूत होऊन शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षणाबाबत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते सोमवारी पारितोषिक वितरण करण्यात आले. सभागृह नेते रवींद्र बारस्कर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, अजय चितळे, सूरज शेळके, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, सुरेश खामकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, शहर समन्वयक लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी रेणावीकर विद्या मंदिरच्या जान्हवी खाडे, विवेकानंद इंग्लिश स्कूलची आर्या निंबाळकर, करण धोकरिया, मनपा प्राथमिक शाळा केडगावचा प्रणव वायभासे, समर्थ विद्या मंदिरची स्वानंदी भारतल, प्रगत विद्यालय श्रेया इप्पलपेल्ली यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी सविता रमेश फिरोदिया नम्रता बनकर, रेसिडेन्शिअल हायस्कूल प्रवीण लाड, ऋतुजा कातोरे, विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील अर्चना ताठी, नय्यर विद्यालयातील अक्षरा जाधव, भाऊसाहेब फिरोदिया शाळेची वैष्णवी कोल्हे यांना मनपाच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
...
सूचना: फोटो: २८ एएमसी नावाने आहे.