विद्यार्थ्यांनी राबवले ग्रामस्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:59+5:302021-09-18T04:21:59+5:30
दहिगावने : राज्यभरात १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी विद्यालयात ...

विद्यार्थ्यांनी राबवले ग्रामस्वच्छता अभियान
दहिगावने : राज्यभरात १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी विद्यालयात येणारे विविध गावांतील विद्यार्थी परिसरातील गावात जाऊन स्वच्छता अभियान राबवत आहेत.
भावीनिमगावात मंदिर, ग्रामपंचायत व शिवस्मारक परिसर, रस्ते व सार्वजनिक ठिकाणाची विद्यार्थी, पालक, गावकरी यांनी स्वच्छता केली. वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता आपल्या गावाची स्वच्छता याबद्दल विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या पावसाचे वातावरण असल्याने सर्व ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता बळावत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानातून झालेल्या स्वच्छतेबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक व्यक्त केले जात आहे. यावेळी सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, प्राचार्य संपत दसपुते, पर्यवेक्षिका अंजली चिंतामण, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, ॲड. सुहास चव्हाण व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक व भावीनिमगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
160921\49381518-img-20210915-wa0029.jpg
दहिगावने - शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षाकांनी भावीनिमगावात स्वच्छता अभियान राबवले.