करिअर शोधासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
By Admin | Updated: June 5, 2016 00:03 IST2016-06-04T23:54:18+5:302016-06-05T00:03:34+5:30
अहमदनगर : दहावी-बारावीनंतर करिअर निवडीच्या अनेक संधी पाहून विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला.

करिअर शोधासाठी विद्यार्थ्यांची झुंबड
अहमदनगर : दहावी-बारावीनंतर करिअर निवडीच्या अनेक संधी पाहून विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला. एकाच छताखाली करिअरच्या संधी शोधण्यासाठी लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये विद्यार्थी-पालकांची शनिवारी मोठी गर्दी झाली होती. अकोलेपासून ते जामखेडपर्यंतच्या भागातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला हजेरी लावून करिअरच्या संधीचा शोध घेतला. औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही खास करून प्रदर्शनाला भेट दिली.
विद्यार्थी व पालकांसाठी ‘लोकमत’च्यावतीने प्रेमदान चौकातील गायकवाड मंगल कार्यालयात ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दिवसभर प्रदर्शनाला गर्दी होती. दहावी-बारावी आणि पदवीनंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याबाबत दिशा देण्यासाठी या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थामध्ये उपलब्ध विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. सकाळी दहापासूनच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहुन विद्यार्थी त्यांच्या पालकांसह आले होते. प्रत्येक स्टॉलवर गंभीरपणे अभ्यासक्रमांची माहिती घेत होते. पुढे काय करायचे? याचे उत्तर या प्रदर्शनातून मिळाले. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याची चिंता ‘लोकमत’मुळे दूर झाली, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. या प्रदर्शनाला शहरातील मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच शैक्षणिक उपक्रमाबाबत ‘लोकमत’चे कौतुक केले. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असणार आहे.
प्रदर्शनात आज काय
कॉम्प्युटराईज्ड अकौंटिगमधील नोकरीच्या संधी
मार्गदर्शक- जयेश ए. रोहिडा (सी.ए.)
वेळ- सायंकाळी ४ वाजता
अभियांत्रिकीनंतरच्या संधी
मार्गदर्शक- डॉ. के.बी. काळे (उपप्राचार्य डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी कॉलेज) वेळ- सायंकाळी ५ वाजता